माझ्या विषयी

      शिक्षकाचे नाव –     श्री संदिप बलभीम वाघमोरे

      शाळा –                       पिंपरी चिंचवड महानगरपालिका 

                                साई जीवन प्राथमिक विद्यालय जाधववाडी कन्या

वेबसाईट –              www.sandeepwaghmore.in

ई-मेल आयडी-       sandeepwaghmore@gmail.com

अ.क्र मुद्देमाहिती
३.नोकरीची  सुरु तारीख१५ जून २००७
४.एकूण सेवा १५ वर्षे ३ महिने
५.यापूर्वी कार्यरत असलेल्या शाळापुनावळे मुले क्रमांक.१०३,रावेत क्रमांक९७,खराळवाडी कन्या व मुले
६.शैक्षणिक पात्रता बी.ए( हिंदी) ,  एम. ए  ( हिंदी)
७.व्यवसायिक पात्रता डी.एड , बी.एड.
८.संगणक  पात्रता एम.एस.सी.आय.टी, पी.एच.पी. कोर्स( वेब डेव्हलपमेंट )
९. पूर्ण केलेली  प्रशिक्षणे  पुनर्रचित अभ्यासक्रम इयत्ता २ री , पुनर्रचित अभ्यासक्रम इयत्ता ७ वी,  N.C.R.T दिल्ली या ठिकाणी e- book संदर्भात महाराष्ट्रातून निवड .
१०.तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी केलेले उल्लेखनीय  शैक्षणिक कार्यध्यास गुणवत्तेचा शैक्षणिक  ब्लॉग निर्मिती (२०१२)शिष्यवृत्ती परीक्षा करिता स्वतंत्र अँड्रॉइड  ॲप ची निर्मिती (२०१६) कोरोना  काळात विद्यार्थ्यांना मोफतऑनलाईन शिक्षण मिळावे करीता स्वतंत्र वेब पोर्टल व ॲपची निर्मिती (२०२०)
११.ध्येय विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने  दर्जेदार शिक्षण मिळवून देणे .

शिक्षक म्हणून सेवेत रुजू झाल्यानंतर शैक्षणिक अहर्ता बी.ए द्वितीय वर्ष अशी होती. यानंतर पुणे विद्यापीठामार्फत बहिस्थ विद्यार्थी म्हणून बी ए तृतीय वर्ष व नंतर हिंदी या विषयात एम. ए ही पदवी  प्राप्त केली. यानंतर पुढे बी.एड ची पदवी प्रथम श्रेणीमध्ये धारण केली.

शैक्षणिक अहर्ता –

पदवीविद्यापीठमहाविद्यालयउत्तीर्णतेचे वर्षशेकडा गुण
बी.ए पुणे विद्यापीठपुणे विद्यापीठ२००८७२.८३ %
एम .ए पुणे विद्यापीठपुणे विद्यापीठ२०१२६४.५० %
एम.एस.सी.आय.टीपुणे विद्यापीठपुणे विद्यापीठ२००६८२.०० %
बी.एडसावित्रीबाई फुले विद्यापीठसावित्रीबाई फले विद्यापीठ२०१५६७.३३ %
पी.एच.पी संगणक प्रमाणपत्र कोर्स पुणे विद्यापीठपुणे विद्यापीठ२०१६८५.०० %

डिजिटल व ऑनलाईन शिक्षणाद्वारे विदयार्थ्यांचे शिक्षण- कृती संशोधन

                          विद्यार्थ्यांना प्रभावी अध्यापन करण्यासाठी शाळेतील शिक्षणाबरोबर डिजिटल व ऑनलाईन शिक्षण देखील महत्त्वाचे आहे.हे महत्त्व ओळखून मी डिजीटल अध्यापनाला २०११ पासुन सुरुवात केली. वर्गात विद्यार्थ्यांना एखादा घटक समजावून देताना तो घटक फक्त साध्या शैक्षणिक साहित्याने शिकवला तर विदयार्थ्याला समजण्यास अडचण येत होती ही समस्या शोधून व्हिडिओचा प्रभावी वापर या विषयावर कृतीसंशोधन करून विद्यार्थ्यासाठी व्हिडिओ ,अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप , वेबसाईट या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले.

या डिजीटल शिक्षणाचा खर्‍या अर्थाने उपयोग करोना कालावधी मध्ये झाला. शाळा बंद असताना विद्यार्थ्याना शिक्षण मिळणे कठीण झाले अशावेळी त्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी इ.१ ली ते ८ वी ७००+ पेक्षा अधिक व्हिडिओ , १०००+ ऑनलाईन टेस्ट व  नियमित ऑनलाईन घरचा अभ्यास असा संच तयार करुन महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना या कृतीसंशोधनाचा वापर झाला.

अशा माझ्या या कृतीसंशोधनाची दखल पिंपरी चिंचवड महापालिकेने घेत  सहामाई अहवालात आमचे शिक्षक आमचे हिरो याअंतर्गत  कार्याची माहिती प्रसिद्ध झाली. याबद्दल तत्कालीन महापौर माननीय सौ. माई ढोरे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला .